Sunday, April 7, 2013

विच वे इज सब-वे?


भारतातल्या cultural transition ला observe करण्यासाठी subway restaurants ही अत्यंत सोयीची जागा आहे. (माफ करा असं दोन भाषांचं मिश्रण करणं मला ही आवडत नाही पण ज्यांच्यावर हे ‘article’ आहे त्यांच्या भूमिकेत जाण्याचा हा माझा ‘लेखकी’ प्रयत्न आहे.)
ह्या ठिकाणांवर order देणे ही एक विशेष प्रक्रिया आहे, त्यासाठी तुमच्याकडे विशेष कौशल्य आणि ज्ञान हवं. सर्वप्रथम, तुम्हाला इंग्रजी, माफ करा, English यायला हवं. दोन मराठी माणसांनी भेटल्यावर English मध्ये किंवा हिंदीतही का बोलावं हा सामान्य मराठी माणसाला कायम पडणारा प्रश्न. पण subway च्या ambience मध्ये शिरल्यावर – तिथल्या A.C. च्या गार हवेत, T.V. वर सुरु असलेल्या VH1 या इंग्रजी संगीत वाहिनी च्या rock, pop संगीतात आणि आजूबाजूच्या sophisticated लोकांमध्ये गेल्यावर तुम्हाला असे प्रश्न पडणार नाहीत. आजूबाजूच्या लोकांचं जाऊ द्या, एकदा मी order देताना काहीसा अडखळलो तर इथल्या serve करणाऱ्याने अत्यंत तुच्छतापूर्वक माझ्याकडे पाहिलं. पुढच्या वेळ पासून मी order पाठ करून जाऊ लागलो!
तुमचं sandwich बनवताना त्यात काय काय टाकायचं हे तुम्हालाच ठरवावं लागतं. हे ज्ञान ही आधी असलेलं उत्तम. म्हणजे bread कुठला हवा, त्यात भाज्या कुठल्या टाकायच्या आणि सर्वात अवघड म्हणजे त्यात sauces कुठले हवे. FC रोड वरचा एक subway मालक तर या menu बद्दल इतकी आत्मीयता बाळगून होता की मी sauces सगळी टाका, असं casually म्हंटल्यावर त्याने मला प्रत्येक sauce चं महत्व आणि चव समजावून सांगितली. ती अर्थात माझ्या लक्षात राहिली नाही. पण मग मी त्या subway मध्ये ही कधी गेलो नाही. गेलो तरी अपराध्यासारखा order देऊ लागलो.
पण इथला सगळ्यात कुतूहलजनक घटक म्हणजे इथली लोकं, consumers म्हणूयात आपण. Polished इंग्लिश बोलणारी, टापटीप कपड्यातली, नाजूक हालचालींची ही मंडळी म्हणजे आपण थेट युरोपात आल्याचा संभ्रम व्हावा अशी. यात ही पुन्हा वर्गवारी आहे. म्हणजे FC रोड वरची college-going, happening मुलं-मुली. ह्यांचा look म्हणजे organized chaos असतो. विस्कटलेली वाटावी अशी मुद्दाम केलेली केशरचना, त्यांचं हिंदी मिश्र इंग्रजी, त्यांच्या गुडघ्यात फाटलेल्या jeans...एकूण super cool! कोथरूड मध्ये मात्र family सोबत येणारी, उन्हाळ्यातही elegant jackets परिधान केलेली, ‘what are you having beta?....I will have only lettuce...the tomatoes don’t look fresh’ असं संभाषण करणारी पुणेरी जनता.
मनात येतं हे कुठले लोक? अगदी स्वाभाविक वाटावं असं इंग्रजी संभाषण हे कधी करू लागले? मित्र-मैत्रिणींमध्ये ठीक आहे पण आजी-आजोबा, आई-वडिलांशीही आपण असं बोलायला कधी शिकलो? अर्थात ‘असं’ म्हणजे काही अर्वाच्य किंवा अनुचित नाही. पण प्रश्न असा की हे ‘स्वाभाविक’ कधी झालं? फक्त भाषा नव्हे, तर ही खाद्य संस्कृती कधी आपल्यात भिनली. subway चं food खरंच healthy आणि hygienic असत म्हणून असावं कदाचित. पण ‘french fries शिवाय burger ची मजा नाही रे!’ – गच्चीवर वाळायला टाकलेल्या बटाटा ‘चिप्स’ (हा तेव्हा मराठी शब्दच वाटायचा) च्या सारणाचे तुकडे चोरून खाता खाता मोठे झालो अन french fries खाऊ लागलो. burger तर burger, ham ही खाऊ लागलो.
पेय संस्कृती असं काही वेगळ नसावं पूर्वी. म्हणजे कैरीचे पन्हे. कोकम, लिंबू सरबतं होतीच पण त्याला असं विशेष वेगळ नामाभिधान नसावं. आता ते देण्यास हरकत नाही. CCD, Barista ची कॉफी ते HRC चे mocktail आणि cocktail सुद्धा यात येतात. हे सगळं पुन्हा अगदी स्वाभाविक. या मागे या संस्कृतीचं आकर्षण आहे का? ते करून पाहण्याची जिज्ञासा? काही दिवसांपूर्वी मी जिथे राहतो त्या आंबेगाव परिसरातल्या CCD मध्ये बसलो होतो. एक नवविवाहित जोडपं तिथे आलं. ह्याच परिसरातलं असावं – लाजरं बूजरं, पहिल्यांदाच CCD मध्ये, किंबहुना पहिल्यांदाच फिरायला बाहेर पडलेलं. नवऱ्याने order देण्याचा कठीण भाग अंगावर घेतला. कुठलीतरी कॉफी निवडून, कदाचित किंमतीचं आश्चर्य वाटून त्याने एकच सांगितली...बायकोच्या हौसे खातर. ती serve झाल्यावर बायको ने अर्थात ‘एकच?’ असं प्रश्न विचारला. त्याची शांतता ओळखून तिने ती कॉफी ‘one by two’ करायला सांगितली. इतक्या वेळ मजेशीर वाटणारा प्रसंग waiter ने ‘तसं नाही करता येत’ म्हंटल्यावर दयनीय झाला. नवऱ्याचा चेहरा खाडकन उतरला. हा यश चोप्रांचा चित्रपट ही नव्हता कि एक घोट त्याने एक घोट तिने एकाच कपातून प्यावा.
मी काही संस्कृती रक्षक नाही की कुठला ‘सैनिक’ नाही. (इतक्या वेळात तुमच्या लक्षात आलं असेलच की मी सुद्धा या ठिकाणांचा consumer आहे). शेवटी संस्कृती म्हणजे जगण्याची एक पद्धत, त्यात परिवर्तनं होणारच झाली – त्याला तुम्ही पश्च्यातीकरण म्हणा की जागतिकीकरण. जे तिथे गेले आहेत, तिथे स्थिरावले आहेत त्यांचं कौतुकच आहे. किंवा व्याक्तिवादानुसार तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (त्या योगे त्यांनी कुणाशी कुठल्या भाषेत बोलावं हा ही माझा प्रश्न गौण आहे). पण जे तिथे नाहीत त्यांनी तिथे जावंच का? ज्यांच्याकडे पैसा आहे, तिथे जाण्याची चटक आहे आणि विशेष म्हणजे तिथे पाउल टाकण्याचं धारिष्ट्य आहे त्यांनी तिथे त्याच भाषेत बोलावं, त्याच पद्धतीने वागावं का? नाहीच जमलं एखाद्याला तर त्याचं हसं व्हावं का? आपण एका वेगळ्याच वर्गीकरणाच्या दिशेने चाललो आहोत का?
प्रश्न बरीच आहेत. परदेशी गेलेले माझे मित्र जेव्हा pub मध्ये, strip club मध्ये गेलो होतो, इच्छा होती, कुतूहल होतं म्हणून गेलो होतो असं सांगतात तेव्हा मजा वाटते. पण ‘सगळे गेले होते, मी कसा नाही म्हणणार’ असं सांगतात (असं सांगणारे तसे कमीच असतात) तेव्हा पुन्हा प्रश्न मनात येतात. आणि अनुत्तरीतच राहतात.