Tuesday, September 8, 2015

Existence: The Joy of Solitude


It’s time to back in the cocoon. Months of vulnerability end in that one moment when you express it, when you think this is the time when everything will break. Is this selfishness? Is this the instinct to protect yourself from the worst? The inability to indulge into that one great thing that stands true through lifetime: pain and the futility of existence.

Probably yes. But what it culminates into is the assertion of self. When you begin to observe minute details, when outward silences don’t matter because there’s a singularity, a purpose to the sounds in your mind. When the need – of a person, of a response, of an understanding – diminishes and you value yourself again. You discover yourself, in the solitude that surrounds you, the solitude that you now know is perpetual and that is probably your only strength.

The last is question is of permanence. The mind yearns for that elusive word – forever. Existence gets torn into the momentary nature of indulgence and a consciousness that this won’t last. The breath is filled with smoke that you love and yet have to pour out. But a mathematical mind also does calculations. 24 hours; 8 for work, 2 for people, 6 for sleep and 8 for me…only for me. Eliminate the dynamics, forget people, ignore their actions, reactions, it’s noise, bear it with the suppleness of a wildflower. Just to maintain the innocence of your purest form – the bud. You will find your cocoon again!    

    

Friday, March 6, 2015

अॅज आय रीड...

एखादं पुस्तक वाचून संपवत असताना, माझ्यात सामान्यतः खूप anxiety असते. तसाही पूर्ण वाचन प्रक्रियेत (जी अनेको महिने चालते) मी शंभर टक्के concentrationसाठी स्वतःशीच अनेक वेळा झगडत असतो. बऱ्याचदा अशी भीती असते की पुस्तक आपल्या आवाक्यातच येत नाहीये. किंवा त्याचं grand design काळात नाहीये. पण ते संपत आलेलं असताना हे प्रश्न उरलेले नसतात. उगाच एक मोहीम फत्ते केल्याचा गर्व असतो. लोकांना सांगायची घाई असते. काही वेळा चर्चा करण्यासाठी, काही वेळा उगाच show-off. मग मूळ प्रक्रियेतून लक्ष उडते. मुळाशी कुठेतरी एक खूप मोठा abstract असतो. काहीतरी संपतंय, हुरहूर लावत हातातून निसटतंय...

गेले काही महिने मी ‘Snow’ या ऑरहन पामुकच्या पुस्तकाशी संगत करतोय. आता पन्नास-एक पानं राहिलीयेत आणि मनात नेहमीच्या anxiety व्यतिरिक्त एक वेगळाच भाव आहे. एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा इतकी तुमच्यासारखी वाटते, जेव्हा इतकं तुम्ही एखाद्या पात्राशी, त्याच्या विचारांशी इतकं relate करू शकता, तेव्हा वाटतं ‘काश...माणसांमध्ये ही क्षमता असती की ते मला इतके समजून घेऊ शकले असते.’ पण हा झाला romantic भाव, self-pity कडे झुकणारा. ‘Snow’ची खरी गंमत हे त्यातल्या काव्यात्मकतेबरोबरचं वास्तवाचं भान आहे. एका स्फोटक राजकीय वातावरणात फिरणारा एक कवी मनाचा माणूस, त्यात त्याला सुचणाऱ्या कविता, त्याचं प्रेमात पडणं आणि एकूणच संवेदनशीलतेमुळे परिस्थितीत अडकत जाणं. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घेतल्याने तो दुखावतो, पण त्याच स्वभावामूळे सगळ्या परिस्थितीच्या coreला जाऊन बसतो, इच्छेने वा अनिच्छेने. आणि मुख्य म्हणजे जितक्या अचंबित दृष्टीने तो या कथेची व्यापकता समजून घेतो तितक्याच हळुवारपणे सगळे बारकावे टिपतो.

इथे मला या पुस्तकाचं परीक्षणं करायचं नाही. तितकी माझी ताकदच नाही. अगदीच ठोकताळ्यांमध्ये बोलायचं, तर पामुकची शैली ही (विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार) जॉईस, Jorge Luis Borges आणि अशा काही पोस्टमॉडर्न लेखकांच्या शैलीने प्रभावित आहे. (या प्रकाराची वैशिष्ट्ये पामुकच्या ‘माय नेम इज रेड’ या सर्वात गाजलेल्या पुस्तकात प्रकर्षाने दिसून येतात असं विकिपिडीया नमूद करतं). याबद्दलही नेमकं विवेचन माझ्या क्षमतेपलीकडे आहे, पण ‘Snow’च्या बाबतीत अगदीच सांगावी अशी टेक्निकल बाब म्हणजे यात वाचकाला सतत ‘तुम्ही वाचत आहात’, असं जागरूक ठेवलं जातं. कथेचा narrator, ‘Ka’ या मुख्य पात्राचा मित्र आहे, जो ‘Ka’च्या मृत्युनंतर, त्याच्या डायरी वरून अंदाज बांधत एक कथा आपल्याला सांगतोय. Narrator बऱ्याचदा असं सांगतो, की ‘डायरीत हे नमूद केलेलं नाही’ किंवा ‘इथे मी थोडं divert होतोय, वाचक मला क्षमा करतील अशी खात्री आहे’ किंवा ‘हा कथेतील vital point आहे’. पोस्टमॉडर्न लेखनामध्ये (माझ्या अगदीच वरवरच्या निरीक्षणांनुसार) ही शैली कथा ही काल्पनिक आहे, हे भान मुद्दाम देण्यासाठी वापरली जाते. पण पामुक तिचा वापर नेमका उलटा करतो. तो याद्वारे कथेची वास्तवता दर्शवतो. तिला काही ठिकाणी अक्षरशः एखाद्या documentचे स्वरूप येते.

ही झाली टेक्निक. कथेच्या दृष्टीने यामूळे घडणारी गम्मत अशी की, ‘Ka’ ज्या कविता लिहितो त्याची फक्त वर्णनं त्याच्या डायरीत सापडतात. मूळ कविता त्याने एका वेगळ्या वहीत लिहिल्या आहेत, जी हरवली आहे. त्यामुळे त्या आपल्याला वाचायला मिळतच नाहीत. एक अतिशय खोल गूढता यामुळे तयार होते. मला तर वाटतं पामुकने या कवितांचं एक पुस्तक वेगळं काढायला हवं. (असेलही कदाचित).

ठोकताळ्यांप्रमाणे सांगायची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पामुक हा नोबेल पारितोषिक विजेता आहे. त्यामुळे माझ्या विवेचनातला तुमचा इंटरेस्ट कदाचित वाढेल!

‘Snow’ची नेमकी कथा काय आहे, ती कुठे घडते, ‘स्फोटक राजकीय परिस्थिती’ म्हणजे काय, या सगळ्या बाबींचा शोध मी तुमच्यावर सोडतो. मला माझी यावेळची, जेव्हा पुस्तक संपत आलंय, त्यावेळची भावना शब्दात बांधायची होती. ती नेमकी अजूनही जमत नाहीये. ‘Snow’ अतिशय संथ आहे. ‘Ka’च्या विचारांनी पानेच्या पाने भरलेली आहेत. पण या विचारांमध्ये अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे. वास्तवाचे जाचक भान आणि त्यापासून पळून जाण्याची एक आतोनात उर्मी, यात हा नायक अडकलेला आहे. एखाद्या पात्राशी साम्य वाटणं, हे शेवटी एक पेर्सेप्शन असतं. पण ‘Ka’ माझ्या खूप आत जाऊन बसलाय. आता तो माझ्या सारखा नसला, तरी मी त्याच्यासारखा झालोय.