Sunday, August 3, 2014

भैरवी


एखादंच गाणं असतं, ज्यात कथा असते. ताला-सूरांत narration चा ओघ असतो, आलापात वाऱ्यात भूरभूरणारे एखाद्या पात्राचे केस असतात.

काय करतं नेमकं गाणं? अनिश्चित चालीतून, वैश्विक शब्दांतून एखाद्या निश्चित स्थळाकडे घेऊन जातं. हे स्थळ तसे ढोबळंच; निश्चित यासाठी की त्याला काही का होईना आकार आहे. भूरभूर उडणाऱ्या केसांखालचे डोळे खिडकीतून कुठेतरी दूर बघत राहतात. आता खळखळून वाहायला लागतील इतके पाणीदार! गळ्यात मात्र अस्खलित गुणगुण...

काय असेल तिची वेदना? गाण्यातल्या भैरवीत कशाचा शेवट शोधात असेल ती?
वारं थांबतं. तिच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सूक्ष्म थरथरतात. ती वळून पाहते तिथे मी उभा असतो.

‘काय करू आज जेवायला?’ ती हसरी होत विचारते.
‘खिचडीच कर. फार त्रास नको करून घेऊस. की आणू बाहेरूनच?’
‘कशाला? मला तरी काय काम आहे!...एरवी बाबांसाठी घरी रोज करावंच लागतं ना!’

काहीतरी उमजल्यासारखं आम्ही एकमेकांकडे पाहतो. तिचे पाणीदार डोळे चमकतात. कांदे चिरताना एकदाचे खळतात.

तिचं नाव हळूहळू आकाराला येऊ लागतं – भैरवी!

5 comments:

  1. skufhoisadufhisd osidfpodsifh osidfodfsihn mcvdfknvodf mlkzmcpsoc
    In short mazya dictionary madhle shabd sample..kay bolu te kalat nai!!

    Apratim!! :)

    ReplyDelete